सुरेश वाडकर and Asha Bhosle - Bhaav Phulanchi Baag Sakhaye

भावफुलांची बाग सखये कशी फुलली
भावफुलांची बाग सखये कशी फुलली
आज कशी रे भुंग्याला या कळी भुलली कळी भुलली कळी भुलली
भावफुलांची बाग सखये कशी फुलली
भावफुलांची बाग सखये कशी फुलली

हा धुंद वारा खट्याळ भारी
हा धुंद वारा खट्याळ भारी
मिठीत मिटली दौलत सारी
भ्रमर फुलांचे चुंबन घेई
भ्रमर फुलांचे चुंबन घेई
खर्‍या सुखाची ओळख पटली ओळख पटली
भावफुलांची बाग सखये कशी फुलली

धरती ल्याली हिरवा शालू
धरती ल्याली हिरवा शालू
हिरवळीत चल जाऊन बोलू
प्रणय सुखाने नको बावरू
प्रणय सुखाने नको बावरू
मनात माझ्या हुरहूर उठली का उठली
भावफुलांची बाग सखये कशी फुलली

साथ आपली तरुणपणाची
साथ आपली तरुणपणाची
प्रीतीला या भिती कुणाची
तुझे नि माझे मीलन होता
तुझे नि माझे मीलन होता
मलाच माझी लाज वाटली लाज वाटली
भावफुलांची बाग सखये कशी फुलली

Written by:
M D devkate, Viswanath More

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

सुरेश वाडकर and Asha Bhosle

View Profile
Marathi Bhavgeet Lofi Mix - EP Marathi Bhavgeet Lofi Mix - EP