Lata Mangeshkar and जयवंत कुलकर्णी - Aayalay Bandara Chandacha Zaj

आयलंय बंदरा चांदाचं जहाज
हावलू बायची पुनिव आज
आयलंय बंदरा चांदाचं जहाज
हावलू बायची पुनिव आज

आ आ आ आ आ आ
परसन झायली एकईरा माय
डोंगरची माय गो डोंगरची माय
आईच्या लेकरांना कमती काय
कमती न्हाय काय कमती न्हाय
परसन झायली एकईरा माय
आईच्या लेकरांना कमती काय
भाताचे पोत्यांनी गाठली शीग
भाताचे पोत्यांनी गाठली शीग
दर्याचे पोटानं मासली ढीग
दर्याचे पोटानं मासली ढीग
वाजव रे ढोलक्या
वाजव रे ढोलक्या नाचाचा बाज
हावलू बायची पुनिव आज
आयलंय बंदरा चांदाचं जहाज
हावलू बायची पुनिव आज

पी रे पोरग्या खुशाल मारी
पी रे पोरग्या खुशाल मारी
पी रे पोरग्या खुशाल मारी हां हां
नेस गो पोरी मुंबईची सारी
नेस गो पोरी मुंबईची सारी
हावलू बाईची गाणी गात
नाचा घालून हातानं हात
हावलू बाईची गाणी गात
नाचा घालून हातानं हात

रातीचा खुलवा
रातीचा खुलवा शिणगार साज
हावलू बाईची पुनिव आज
आयलंय बंदरा चांदाचं जहाज
हावलू बायची पुनिव आज
आबालान हसतंय चांद हसतंय चांद
हसतंय चांद
उसळला दर्या फोरुनी बांध फोरुनी बांध
फोरुनी बांध
अशी खुशीला आयली भरती
भरला उजेड खाली निवर्ती
खेलाले झिम वाजवा जहाज
हावलू बाईची पुनिव आज
आयलंय बंदरा चांदाचं जहाज
हावलू बायची पुनिव आज

Written by:
Dajekar Datta, G D Madgulkar

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

Lata Mangeshkar and जयवंत कुलकर्णी

View Profile