Asha Bhosale and शाहीर अमर शेख - Raaga Raagane Gela Nighun

रागारागाने गेला निघून
रागारागाने गेला निघून
काय करू तुम्हा मागं जगून
काय करू तुम्हा मागं जगून
राजसा राजसा काय करू तुम्हा मागं जगून

तुमची अमुची संगत होती बाळपणापासून
आहो बाळपणापासून
वळुनी न बघता तुम्हीच गेला दासीवर त्रासून
आहो दासीवर त्रासून
तुम्हीच तोडली प्रीत अचानक इतक्यावर पोचून
दोरीवाचून मी बावडी येते गोत्यात हो हर घडी
वारेवादळ पाऊसझडी कशी राहू अशामधे तगून
हो हो काय करू तुम्हा मागे जगून
राजसा राजसा काय करू तुम्हा मागं जगून

चुकी आमची कळली होती आम्हा मागाहून असं का
आला होता पुन्हा उमाळा तुम्हासी पाहून हा
दूरपणा तर तुम्हीच दाविला हातावर राहून
चिडल्या साळूच्या काट्यावाणी फेक शब्दाची केली कुणी
आमच्या डोळ्यात आलं पाणी तिरस्कारानं उरी धगधगून
रागारागाने गेला निघून रागारागाने गेला निघून

बोलाबोलाची झाली लढाई नव्हे भावनांची
आहो नव्हे भावनांची
पिळणी पिळणीनं जुळणी झाली दोन्ही मनांची
आहो दोन्ही मनांची
ही रीतच असते अहो राजसा प्रेमी सज्जनांची
झाले गेले ते जावो मरून आता बसिन पाया धरून
हात फिरवा जी पाठिवरून हात फिरवा जी पाठिवरून
हसा डोळ्यांत माझ्या बघून
हो हो काय करू तुम्हा मागे जगून
राजसा राजसा काय करू तुम्हा मागं जगून

तुला बघून आला माझ्या मनी कळवळा
तुझे दान घ्यावया हात नाही मोकळा
एकवार घडे ग प्रीत कुठुन वेळोवेळा
जरी हिंडे मी वाऱ्यावर मन नाही ग थाऱ्यावर
कुण्या काळजात माझं घर कुण्या काळजात माझं घर
तिथं काळिज गेलं निघून
काय करू तुम्हा मागे जगून
काय करू तुम्हा मागे जगून

Written by:
Vasant Pawar, G D Madgulkar

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

Asha Bhosale and शाहीर अमर शेख

View Profile