Suman Kalyanpur - Hale Ha Nandaghari Palana

हले हा नंदाघरी पाळणा
हले हा नंदाघरी पाळणा
त्यात देखणा गोजिरवाणा
हसतो गोकुळराणा नंदाघरी पाळणा
हले हा नंदाघरी पाळणा

ओठ लाल ते डोळे चिमणे
हास्यातून त्या फुले चांदणे
ओठ लाल ते डोळे चिमणे
हास्यातून त्या फुले चांदणे
स्वरुप सुंदर लोभसवाणे
स्वरुप सुंदर लोभसवाणे
मोहून घेई मना
हले हा नंदाघरी पाळणा
हले हा नंदाघरी पाळणा

बोल बोबडे ते भाग्याचे
शब्द वाटती ते वेदाचे
बोल बोबडे ते भाग्याचे
शब्द वाटती ते वेदाचे
रुणझुणताती घुंगुरवाळे
रुणझुणताती घुंगुरवाळे
ये धेनूना पान्हा
हले हा नंदाघरी पाळणा
हले हा नंदाघरी पाळणा

नंद यशोदा करिती कौतुक
आनंदाचे अमाप ते सुख
नंद यशोदा करिती कौतुक
आनंदाचे अमाप ते सुख
मायपित्याविण कसे कळावे
मायपित्याविण कसे कळावे
सौख्य तयाचे कुणा
हले हा नंदाघरी पाळणा
हले हा नंदाघरी पाळणा
त्यात देखणा गोजिरवाणा
हसतो गोकुळराणा नंदाघरी पाळणा
हले हा नंदाघरी पाळणा

Written by:
Vasant Prabhu, Madhukar Joshi

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

Suman Kalyanpur

Suman Kalyanpur

View Profile