Suman Kalyanpur - Kuni Nindave Va Vandave

कुणी निंदावे वा वंदावे
कुणी निंदावे वा वंदावे, फोल पसारा सारा रे
कृष्णरूप जग झाले आता
कृष्णरूप जग झाले आता, मी तर वेडी मीरा रे
कुणी निंदावे वा वंदावे

सदनी असो वा वनात किंवा जळात राहो रणात अथवा
नामघोष तो एकच हृदयी राधाधर हरि मिलिंद रे
कुणी निंदावे वा वंदावे

वृंदावन जन गोकुळ गुणिजन
वृंदावन जन गोकुळ गुणिजन, सेवा ध्यान तपोधन सारे
इच्छा एकच मनात नांदे हरिपावन मन जीवन रे
कुणी निंदावे वा वंदावे

देहचि मंदिर आत्मा गिरिधर, नयन सरोवर तीर्थचि रे
देहचि मंदिर आत्मा गिरिधर, नयन सरोवर तीर्थचि रे
मीरेचे प्रभु मोहन श्रीधर, पाप विनाशी नामचि रे
कुणी निंदावे वा वंदावे, फोल पसारा सारा रे
कृष्णरूप जग झाले आता, मी तर वेडी मीरा रे

Written by:
Ashokji Paranjape, Ashok Patki

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

Suman Kalyanpur

Suman Kalyanpur

View Profile