Asha Bhosle - Janmach Ha Tujsathi Priya Re

जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी
नव्हत्या माहीत मज वेडीला
नव्हत्या माहीत मज वेडीला जऱ्मांतरीच्या गाठी
जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी

मनात आला विनोद केवळ
बोलुन गेले काही अवखळ
मनात आला विनोद केवळ
बोलुन गेले काही अवखळ
ओठी होती अल्लड बोली
ओठी होती अल्लड बोली आपुलकी पोटी
जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी

चुरगळली मी हिरवी पाने
सहजपणाने अज्ञानाने
चुरगळली मी हिरवी पाने
सहजपणाने अज्ञानाने
आज उमटली लालस मेंदी
आज उमटली लालस मेंदी तळहाती बोटी
जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी

परिहासाची विसर बोलणी
आठव होते काय लोचनी
परिहासाची विसर बोलणी
आठव होते काय लोचनी
परिचय झाला प्रणयासाठी
परिचय झाला प्रणयासाठी परिणय मग शेवटी
जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी

Written by:
Sudhir Phadke, G D Madgulkar, SUDHIR V PHADKE

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

Asha Bhosle

Asha Bhosle

View Profile